What is Insurance? Explained..

आताच्या घडीला जीवन फारच गुंतागुंतीचे होऊन बसले आहे.त्यात आणखी एक कोरोना सारखी महामारी येऊन बसली आहे.जीवन आणि संपत्ती महत्वाचे अंग बनले आहे,परंतु यात जर काही अपघात झाला तर जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.जसे की आर्थिक परिस्थिती कमकुवत होणे.यावर एक अडचणीच्या वेळी आर्थिक हातभार मिळेल असा विषय म्हणजे विमा संरक्षण योजना होय.


तर आपण आज इन्शुरन्स(विमा) याबद्दल माहिती घेणार आहोत.

    विमा म्हणजे काय?

    विमा कंपनी आणि विमा व्यक्ती यांच्यामधील झालेला कायदेशीर करार असतो.यामध्ये विमा कंपन्या विमा घेणाऱ्या व्यक्तीला त्याची झालेली आर्थिक हानी भरून देण्याचे आश्वासन  देते.यासाठी प्रत्येक विमा कंपन्याचे काही नियम तयार केलेले असतात.विमा लाभार्थ्यांना या नियमात राहूनच विमा योजना भेटते.

    विमा कसे कार्य करते?

    विमाधारक विमा कंपनीकडून कायदेशीर करार करण्यात येतो,ज्याला विमा पोलिसी असे म्हणतात.यामध्ये प्रामुख्याने विमा योजना बद्दल माहिती दिली जाते.स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला संरक्षित करण्यात विमा योजना एक महत्वाची भूमिका बजावतो.आर्थिक हानी झाली तर त्यातून बाहेर पडण्यासाठी विमा हे एक 
    उपयुक्त माध्यम ठरते.कोणतीही व्यक्ती किंवा कंपनी विमा कंपनीकडून विमा घेऊ शकते,परंतु विमा देण्याचा निर्णय विमा कंपनीच्या निर्णयावर अवलंबून असतो.सामान्यत: विमा कंपन्या उच्च-जोखमीच्या अर्जदारांना विमा देण्यास नकार देतात.

    विमा प्रकार किती असतात ?

    विमामध्ये प्रामुख्याने काही प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे,
    जीवन विमा
    आरोग्य विमा 
    कार विमा 
    शिक्षण विमा
    गृह विमा असे प्रकार पडतात.

    जीवन विमा 

    जीवन विमा योजना अगदी नावाप्रमाणेच कार्य करते.विमाधारक व्यक्तीचे जर अकाली मृत्यू झाला तर जीवन विमा त्या विमाधारकाच्या कुटुंबातील वारसदारांना जीवन विमा योजनेअंतर्गत ठरलेली आर्थिक रक्कम देऊ करते.आपले कुटुंब जर पूर्णपणे आपल्यावरच अवलंबून असेल तर जीवन विमा योजना खूपच उपयुक्त ठरते.लाइफ इन्शुरन्स अंतर्गत विमाधारक कुटुंबाला विमायोजना कालावधीत विमाधारकाची मुदत संपल्यास आर्थिक भरपाई दिली जाते.

    आरोग्य विमा 

    महागड्या उपचारासाठी वैद्यकीय खर्चाची भरपाई करण्यासाठी खरेदी केला जातो. विविध प्रकारच्या आरोग्य विमा पॉलिसींमध्ये रोग आणि आजारांचा समावेश असतो.आरोग्य विमा योजनेअंतर्गत भरलेला प्रीमियम सामान्यत: उपचार, हॉस्पिटलायझेशन आणि औषधाचा खर्च समाविष्ट करतो.भारत सरकारने ESIC च्या माध्यमातून कामगारांना आरोग्य विमा प्रदान केला आहे.ज्याचा उपयोग करून विमाधारक स्वतःचा व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित करू शकतो.

    कार विमा 

    आजच्या जगात प्रत्येक कार मालकासाठी कार विमा हे एक महत्त्वपूर्ण धोरण आहे.यामध्ये कार मालक हा विमा अपघातांसारख्या कोणत्याही अनुचित प्रकारापासून आपले संरक्षण करण्यासाठी कार विमा काढला जातो.

    शिक्षण विमा 

    शिक्षण विमा हे जीवन विमा योजनेसारखेच आहे जे खास बचत साधन म्हणून तयार केले गेले आहे. जेव्हा आपल्या मुलाचे वय उच्च शिक्षणासाठी व कॉलेजमध्ये प्रवेश घेते तेव्हा (18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त) शैक्षणिक विमा हा एक चांगला मार्ग असू शकतो. हा निधी नंतर आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी वापरला जाऊ शकतो. यामध्ये सुरुवातीला आपल्याला काही वर्षे विमा प्रीमियम द्यावे लागते.

    शेती आणि गृह विमा

    सर्वजण स्वतःच्या हक्काच्या घरांची स्वप्न पाहत असतात.विमा आग आणि इतर नैसर्गिक आपत्ती किंवा संकट यासारख्या अपघातामुळे आपल्या घराचे नुकसान किंवा शेतात लावलेल्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी मदत करू शकते. शेती आणि गृह विम्यात वीज, भूकंप इत्यादीसारख्या घटनांचा समावेश आहे.  

    विमा योजनेचे काही फायदे

    विमा योजनेअंतर्गत आपण आपल्या मरणोत्तर आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देऊ शकतो.
    विमा योजने अंतर्गत आपण महागड्या आजाराचे निदान करू शकतो.
    नैसर्गिक आपत्ती पासून जसे की भूकंप,महापूर किंवा महामारी जसे की कोरोना यापासून आर्थिक परिस्थिती मजबूत राहण्यास एक मदत.

    आशा करतो की आपल्याला विमा म्हणजे काय?आणि विम्याचे प्रकार याबद्दल माहिती मिळाली असेल.आणखी काही माहिती हवी असल्यास किंवा काही शंका असल्यास कंमेंट करा.

    Post a Comment

    Post a Comment (0)

    Previous Post Next Post