तुझे सुरज कहू या चंदा,तुझे फुल कहू या तारा,मेरा नाम करेंगा रोशन,जग मे मेरा राज दुलारा...!
मुलाला जन्म देऊन वाढवणे ही मानवी जीवनातील एक सर्वाधिक कृतार्थ क्षण आहे.त्यामुळे पित्याला जबाबदारी सोबत आनंदाचा अक्षय झरा मिळतो व त्याच पुरुषत्व सार्थक होते.
कुटुंब संस्था ,विवाह,एक पती-पत्नी व्रत पाळणे आणि विवाह हा करार नसून संस्कार आहे,अस मानल्यामुळे भारतीय संस्कृतीत यासंबंधी अनेक मिथके रचली व ती आजच्या अत्याधुनिक युगातही बऱ्याच अंशी कायम व समाजमान्य आहेत.
त्यातूनच पुत्र म्हणजे वंशाचा दिवा कौटुंबिक नाव पुढे नेणारा वारस आणि मृत झाल्यावर अग्नी देऊन स्वर्गात पितर पोहोचवणं.
यामुळे कुटुंबात मुलगा झाला की आनंदाचा क्षण मानला गेला आणि मुलीचा जन्म दुःखाच सावट जाऊ लागलं तो एक चिंतेचा विषय आहे.
पण आज मला बाप-लेकाच्या नात्याचे नैसर्गिक, भावनिक व सांस्कृतिक पैलू मांडून या महत्वाच्या नातेसंबंधाचा वेध घ्यायचा आहे.यासंदर्भात नेहमी प्रमाणे पाश्चात्य देशांमध्ये बरच अभ्यास व संशोधन झालं आहे.
आज बापाच कर्तव्य काय तर मुलांसाठी,घरासाठी भाकरी कमावणे.त्यांना सुरक्षित भविष्य देणे. पुन्हा आजच युग हे न्यूक्लीअर फॅमिलीच आहे.
मुलांवर प्रेम करण्यापेक्षा मुलांना शिस्त लावणारा ,धाक लावणारा तो बाप ,असा त्यांचा रोल नव्याने लिहिला गेला.भारताचा विचार करता मुलांसाठी आई ही कितीही प्रिय असली तरी त्यांचा रोल मॉडेल हा बाप असतो.
बापासारखं आपण दिसावं.वागावं यासाठी त्याचा अट्टाहास असतो.कारण सूज्ञपणे त्यांच्या मनात हे असत की आपण बापाकडून घराण्याचे वारस आहोत.आपली बहीण मोठेपणी लग्न करून सासरी जाणार आहे.त्यामुळे उद्या बाप थकल्यावर घराण्याचा वारसा व परंपरा चालवण्याची जबाबदारी आपली आहे व त्यामुळं मुलगा हा बापाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो.
आई फक्त प्रेम करते,प्रसंगी आसव ढाळते. पण बाप हा शूर ,कणखर असतो.संकट प्रसंगी डगमगत नाही.त्यामुळे तो मुलांचा पहिला नायक असतो.
जुन्याकाळी कामावरून बाबा घरी यायची वेळ झाली की घर सामसूम व्हायचं.हा धाक मुलास बापाप्रति प्रेम करायचा.आवड निर्माण करायचा.पण नव्या पिढीच्या बाप मुलांसाठी मस्कुलइन संस्कार विसरत पॅडर सेन्सेटिव्ह होताना दिसतोय.हा बदल मुलांच्या वाढीसाठी सकारात्मक आहे.
माझ्याकडून माझ्या वडिलांच्या खूळ अपेक्षा आहेत आणि सगळ्याच वडिलांच्या असतात.अस का असू शकत नाही कारण ते आपल्यासाठी रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून कष्ट करून फक्त आपल्याला जगवतात. कारण की आपण त्यांना त्यांच्या म्हातारपणी योग्य पद्धतीने सांभाळावे यासाठी ते जगत असतात.ही एकच त्यांची अपेक्षा असते.माझे वडील मला नेहमी सांगतात मी फक्त तुझ्याकडे पाहून जगत आहे.मग मला कळते की मला या जीवनात माझ्या वडिलांसाठी काहीतरी करून दाखवायचे आहे.
आजकाल मुलामुलींना याची जाणीव नाही कारण त्यांचा बाप स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन पैसे कमवत असतो.परंतु आजकाल ही मुलं तरुण रक्त म्ह्णून कोणतीही फॅशन करतात.मी फक्त एवढेच म्हणेल की आपल्या बापाचं आदर करायला शिका .
Post a Comment