शेअर बाजार म्हणजे काय || Share Market Information in Marathi

भारतात एकूण 136 करोड लोकसंख्या आहे,तरीसुद्धा फक्त 51 दशलक्ष डिमॅट अकाउंट आहेत.याचे कारण काय असावे? आपण जोखीम घेण्यास इतर देशांपेक्षा खूप मागे आहोत.याचे कारण SHARE MARKET कडे व्यवसाय म्हणून पाहत नाही.योग्य प्रकारे समजून घेत नाही.तो व्यवस्थितपणे समजून घेतला आणि जाणीवपूर्वक जोखिम घेतली तर हा एक उत्तम व्यवसाय बनू शकतो.चला तर मग आज आपण जाणून घेऊ या SHARE MARKET मधील BASIC गोष्टी.

    TYPES OF BUSSINESS ENTITIES


    1.Sole proprietorship :

    मालकी एकाची असणे किंवा एकट्याने चालवलेला व्यवसाय .यामध्ये उदारणार्थ आपण किराणा मालाचे दुकान घेऊ शकतो.ज्याचा नफा आणि तोटा एकाचाच होतो.

    2.PARTNERSHIP 

    म्हणजे भागीदारी.यामध्ये व्यवसायला नफा आणि तोटा झाला तर तो दोन भागात विभागला जातो.म्हणजेच या प्रकारात व्यवसायाचे दोन कायदेशीररित्या दोन मालक असतात.

    3.LIMITED LIABILITY PARTNERSHIP

    यात कमीत कमी 2 
    डायरेक्टर असावे लागतात आणि जास्तीत जास्त साठी काही मर्यादा नसते.काही वेळा परदेशी गुंतवणूकदार सुद्धा घेऊ शकतो.

    4.PRIVATE LIMITED COMPANY

    यामध्ये प्रामुख्याने काही ठराविक प्रमाणात डायरेक्टर असतात.SHARE MARKET मध्ये गुंतवणूक करण्यासाठी या प्रकारच्या कंपनीला जास्त प्राधान्य दिले जाते.

    5.PUBLIC LIMITED COMPANY


    या प्रकारात मालकी हक्क हा सामान्य नागरिकाचा सुद्धा असू शकतो यात सामान्य व्यक्ती सुद्धा समभाग खरेदी करू शकतो.यात सुद्धा गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देतात.

    OWNERSHIP OF A COMPANY THAT MAY BE PURCHASED BY AN INVESTOR.

    TYPE OF MARKET


    1.PRIMARY MARKET

    या प्रकारात SHARE ची किंमत ठरलेली असते.1 लॉट हा 10 ते 15 हजारांचा असतो.यामध्ये SHARE हे कंपन्याकडून प्रत्यक्ष लोकांना दिले जातात.

    2.SECONDARY MARKET 

    या प्रकारात यादी ठरलेली असते.SHARE ची देवाणघेवाण लोकांकडून लोकांपर्यंत देण्यात येतो.यामध्ये कंपनीचा काही संबंध नसतो.SECONDARY MARKET मधील कंपन्या STOCK EXCHANGE वर नोंदणी करतात.

    भारतात 21 STOCK EXCHANGE आहेत.त्यातून सर्वात मुख्य आणि प्रसिध्द 2 आहेत.

    1. NSE : NATIONAL STOCK EXCHANGE

    2. BSE : BOMBAY STOCK EXCHANGE

    या स्टॉक EXCHANGE वर SEBI(SEQUIRITY AND EXCHANGE BOARD OF INDIA) चे नियंत्रण असते.याची स्थापना 30 जानेवारी 1992 मध्ये मुंबईत झाली.

    1.NSE : NATIONAL STOCK EXCHANGE 
    याची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली.NSE मध्ये एकूण 2000 पेक्ष्या जास्त नोंदणीकृत कंपन्या आहेत.भारतात सर्वात जास्त ट्रेडिंग यावर होत असते.

    2.BSE : BOMBAY  STOCK EXCHANGE 
    आशिया खंडातील सर्वात पहिले STOCK EXCHANGE म्हणून याची ओळख आहे.याची सुरुवात 1857 साली झाली.यामध्ये 5000 हुन जास्त नोंदणीकृत कंपन्या आहेत.

    DEMAT ACCOUNT

    आपण विकत घेतलेले SHARE यात इलेक्ट्रॉनिक पध्दतीने ठेवले जाते.
    जसे की SHARES, BONDS, GOVERMENT SEQURITIES,MUTUAL FUNDS, आणि EXCHANGE TRADING FUND इत्यादींचा समावेश असतो.
    यावर CDSL आणि NSDL यांचे नियंत्रण असते.
     

    BROKER

    मार्केट वर नियंत्रण करण्यासाठी SEBI असते.परंतु SEBI सर्वाच व्यवहारांचे व्यवस्थापन करू शकत नाही यासाठी पर्याय म्ह्णून SEBI REGISTERD BROKER ची नियुक्ती करण्यात येते,जेणेकरून सर्वसामान्य लोकांना पण SHARE ची देवाणघेवाण करणे सोपे आणि सोयीस्कर व्हावे.याबदल्यात आपल्याला काही ब्रोकरेज ब्रोकर ला द्यावे लागतात.

    SUB-BROKER :

     हा जरी SEBI REGISTERED नसला तरी सुद्धा SEBI REGISTER BROKER चे कामकाज हा बघत असतो,आणि मार्गदर्शन सुद्धा करतो.सर्व व्यवहार याकडून होते.

    TYPES OF BROKER :


    1.FULL SERVICE BROKER : 

    हा BROKER सर्व प्रकारच्या मदतीस तसेच मार्गदर्शन करण्याची सेवा पुरवतो.त्यामुळे याचे ब्रोकरेज सुद्धा जास्त द्यावे लागते.
    उदारणार्थ ANGEL BROKING याच्या मदतीने आपण कोणता समभाग घ्यावा हे सुचवितात. तसेच आपल्याला कोणताही समभाग खरेदी करायचा असल्यास आपण कॉल करून तसेच ऑनलाईन पद्धतीने करू शकतो.एकंदरीत हा ब्रोकर आपल्याला सगळ्या प्रकारे मदत करतो.

    2.DISCOUNT BROKER

    हा ब्रोकर full service broker सारखी सुविधा पुरवीत नसल्याने यांचे ब्रोकरेज कमी असते,जसे की Zerodha आणि Upstock.हा ब्रोकर आपल्याला ट्रेडिंग साठी फक्त एक प्लॅटफॉर्म देतो बाकी सगळे आपल्यालाच करावे लागते.

    Indian Market Timing :
    भारतीय Share Market हे आठवड्यात 5 दिवस चालू असते तर शनिवारी आणि रविवारी बंद असते.इतर काही सण किंवा सार्वजनिक सुट्ट्यामध्ये सुद्धा बंद असते.दररोज सकाळी 09:15 चालू होते आणि दुपारी 03:30 ला बंद होते.

    CONCEPT IN MARKET :

    भारतीय SHARE MARKET चे मुख्य निर्देशांक निफ्टी 50 आणि सेन्सेक्स आहेत.ज्यात NIFTY मध्ये जास्त भांडवल असणाऱ्या 50 कंपन्यांचा समावेश असतो.हया कंपन्यांच्या आधारे निफ्टी चा निर्देशांक ठरत असतो.
    SENSEX मध्ये जास्त भांडवल असणाऱ्या 30 कंपन्यांचा समावेश होतो.ह्या 30 कंपन्यांच्या आधारे सेन्सेक्स चा निर्देशांक ठरत असतो.

    CAPITALISATION :
    थोडक्यात सांगायचे झाल तर ,

    SHARE PRICE × NUMBER OF SHARE OUTSTANDING = CAPITALISATION

    भांडवल वरून कंपन्याचे प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे:
    1. ज्या कंपनीचे भांडवल 20,000 कोटींपेक्षा जास्त आहे तिला LARGE CAP असे म्हणतात.
    2. ज्या कंपनीचे भांडवल 05,000 कोटींपेक्षा जास्त आहे तिला MID CAP असे म्हणतात.
    3.ज्या कंपनीचे भांडवल 05,000 कोटींपेक्षा कमी आहे तिला SMALL CAP असे म्हणतात.
    4.ज्या कंपनीचे भांडवल खूपच कमी आहे तिला PENNY CAP असे म्हणतात.यामध्ये एखाद्या दुकानाचा किंवा नवीन लघुउद्योग याचा समावेश असतो.

    BASIC OF SHARE MARKET :

    SHARE MARKET मध्ये दोन पध्दतीने  देवाणघेवाण चालते.

    1.EQUITY

    या प्रकारात खरेदी केलेला SHARE आपण कितीही काळ ठेऊ शकतो.तसेच या प्रकारात आपल्याला बाजारमूल्य च्या भावात SHARE खरेदी करावा लागतो.

    2.DERIVATIVE

    या प्रकारात SHARE ची दोन प्रकारे देवाणघेवाण होती.
    ज्यामध्ये CAll म्हणजे SHARE की किंमत वाढणे आणि PUT म्हणजे SHARE की किंमत कमी होणे.
    या बद्दल आपण पुढे माहिती घेणारच आहोत.

    Post a Comment

    Post a Comment (0)

    Previous Post Next Post