वसुंधरा दिन २०२१ | Earth Day 2021: Quotes, Wishes, Messages, Greetings, Slogans, WhatsApp and Facebook Status, Poems, and more

हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे 
ही वसुंधरा जनसंखेच्या भाराने रडते आहे ||धृ||

पृथ्वीच्या पाठीवरती ही अफाट झाली गर्दी 
गर्दीतच जन गुदमरतीदु :खात किती तळमळती 

हे संततीचे अज्ञान जगाला भेसूर छळते आहे ||||

या नद्या नव्हे रे गंगा संजीवन तुजला देती 
तू करुनी जल अपवित्र का पाप घेतसे माथी 

हे पात्र नद्यांचे सुखमय कर दुसरीकडे वळते आहे ||||

हा पावन निर्मल वाराजो श्वास तुझा रे होतो 

तू दूषित करुनी त्यालाविश्वास कसा गमवितो

हे दु :ख अनावर धरणीला रे अविरत सलते आहे ||||

ही झाडे तुजला देती रे उन्हात शीतल छाया 

अन मधुर फळे पुरविती रे जीव तुझा जगवाया

हि कुरहाड झाडांवरती नाही तुजवर पडते आहे ||||

ही पुन्हा हसावी धरणीपक्ष्यांनी गावी गाणी 

धावे कर्तव्य म्हणुनी
ही बिरादरी इन्सानी 
या अभियानात सामील व्हा,
ज्यांना हे कळते आहे ||||
दरवर्षी आपण २२ एप्रिल रोजी वसुंधरा दिन साजरा करत असतो.हा दिवस आपण पृथ्वीच्या संरक्षणच्या उद्देशाने साजरा करत असतो.ज्याची सुरुवात सन १९७० मध्ये अमेरिकेत जेराल्ड नेल्सन ने केली होती.हा दिवस सर्वांसाठी महत्वाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

वसुंधरा म्हणजे आपली आई म्हंटलं तरी वागावं ठरणार नाही.सर्व जिवांना आपल्या कुशीत ठेवण्याचं काम ही वसुंधरा म्हणजे आपली पृथ्वी करते.या प्रति आपलेही काही कर्तव्य बनते की आपण तिची काळजी घेऊन पृथ्वीचे जतन केले पाहिजे.
परंतु आजची परिस्थिती पाहता असे लक्षात येते की जतन करण्याऐवजी आपणच पृथ्वीला हानी पोहचवण्याचा काम करत आहोत.

मनुष्यवस्ती साठी आपण बेसुमार जंगल तोड करत आहोत.त्यात कित्येक अश्या औषधी तश्याच इतर वृक्षांच्या जाती नष्ट होत आहेत.त्यामुळे पर्यावरणाची होणाऱ्या हानीला आपणच कारणीभूत आहोत.जंगलात वास्तव्य करण्याऱ्या वन्य जीवांचे पण हाल होत आहेत.हे कुठेतरी थांबायला हवे,नाहीतर पृथ्वीचा समतोल राखला जाणार नाही.

झपाट्याने विकसित होण्याऱ्या औद्योगिकिकरणामुळे कारखान्यातून निघणारे रासायनिक पाणी हे जमिनीची तसेही पाण्याची गुणवत्ता खराब करत आहे.त्याने मानवी जीवन तसेच अन्य  जीवांवर परिणाम करत आहे.कारखान्यातून निघणाऱ्या वायूने किती मोठया प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे.मनुष्य त्याच्या स्वार्थासाठी आपल्या पृथ्वी चे ,निसर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत चालला आहे.

२०२० या साली जगात सर्वात मोठे असणारे जंगल ऍमेझॉन यात भयंकर आग लागली होती,या ऍमेझॉन ला पृथ्वी चे हृदय म्हणतात.हे ऍमेझॉन ला लागलेल्या आगीत जवळजवळ १७ टक्क्यांहून अधिक वृक्ष जाळून खाक झाले होते.पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन ची निर्मिती येतेच होते.या आगीत बहुमूल्य अशी नैसर्गिक साधनसपंती जाळून राख झाली.त्याच बरोबर तिथले वन्य जिंवांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
ओझोन वायू चा ठार दिवसेंदिवस कमी होत चालला आहे परिणामी पृथ्वीवर सजीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

 वसुंधरा दिन २०२१ | Earth Day 2021: Quotes, Wishes, Messages, Greetings, Slogans, WhatsApp and Facebook Status, Poems, and more

पृथ्वी वाचवा,
भविष्यातील पिढ्या वाचवा.
२०२१ वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Earth Day 2021: Quotes, Wishes, Messages, Greetings, Slogans, WhatsApp and Facebook Status, Poems, and more
जर आपण प्राण्यांचे दु: ख दूर करू शकू, वनस्पती टिकवून ठेवू शकू आणि नैसर्गिक संसाधनांचा शहाणपणाने उपयोग करू शकलो तर आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवस हा पृथ्वीदिन उत्सव असू शकतो.
वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा!

आपल्या सर्वांना ताजी हवा श्वास घेण्याचा, नैसर्गिक आहार घेण्याचा आणि स्वच्छ पाणी पिण्याचा हक्क आहे.
दुर्दैवाने, ते घडत नाही.
आपण सर्वांनी त्या अधिकारांमध्ये ताळमेळ घडवून आणावा आणि आपल्या मुलांना निरोगी वातावरणात वाढवायला हवे.
पृथ्वी दिनाच्या शुभेच्छा!


जे झाडे लावतात आणि प्राण्यांना खायला घालतात त्यांना स्वतःपेक्षा पृथ्वीवर अधिक प्रेम आहे.

पृथ्वीवर आपल्याकडे गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी संसाधने आहेत,
परंतु आपला लोभ पूर्ण करण्यासाठी फार कमी स्त्रोत आहेत

आपणास माहित आहे काय की प्रत्येक माणसामध्ये काय सामान्य आहे?  
पृथ्वी!आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जेव्हा पूर्ण वायू प्रदूषित होईल, 
पाण्याचा शेवटचा थेंब दूषित होईल, 
शेवटचा अन्नाचा घास कमी होइल, 
तरच आपल्याला समजेल की आपण पैसे खाऊ शकत नाही.  
वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा!

पृथ्वीची सर्वात मोठी समस्या आणि पृथ्वीच्या ढासळत्या अवस्थेसाठी चमत्कारीक उपाय म्हणजे माणूस.

हिरवळ वाढवा,
शाकाहारी व्हा, 
ग्रह वाचवा!

प्रदूषण तात्पुरते आहे,
पृथ्वी कायम आहे.

पृथ्वीने प्रत्येकाच्या गरजा भागविल्या पाहिजेत,
पण प्रत्येक मनुष्याचा हाव नाही.
-महात्मा गांधी
या २०२१ च्या वसुंधरा दिनी आपण एकच संकल्प करूयात की मातेसमान आपल्या वसुंधरा(पृथ्वीचे) आम्ही मनापासून स्वछ-सुंदर करू तसेच स्वतःच्या स्वार्थासाठी पृथ्वीला नुकसान न पोहचू  देता ,पृथ्वीचे रक्षण आणि संगोपन करू.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post