महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे.

दरवर्षी एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.हा दिवस महाराष्ट्र राज्यासाठी खूपच सुंदर दिवस आहे , कारण याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.या दिवशी महाराष्ट्र राज्यात एक वेगळाच सण-उत्सव साजरा केला जातो.या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येते.या कार्यक्रमात आपल्या मराठी संस्कृती चे दर्शन घडते.

ती वेळ होती सन १९४७ जेव्हा भारत देश हा संपूर्ण स्वतंत्र झाला ,त्यावेळेस पश्चिम भारतात बॉम्बे हे एक स्वतंत्र राज्य होते (आताच्या मुंबई आणि गुजरात राज्यात) सन १९५० साली संयुक्त महाराष्ट्र समिती ने द्विभाषिक मुंबईला एक मराठी भाषाचे राज्य निर्माण करण्यासाठी मागणी केली.सन १९५० मध्ये आंध्रप्रदेश ,केरळ आणि कर्नाटक ची निर्माण केले,परंतु केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी केलेल्या अर्जाकडे दुर्लक्षित केले.केंद्र सरकारच्या या धोरणाने वैतागून महाराष्ट्र राज्यातील जनतेने याविरुद्ध आवाज उठवण्याचा निर्धार केला.


अस पण म्हंटलं जात की महाराष्ट्र आणि गुजरात बॉम्बे नावाच्या राज्याचा एक हिस्सा होता.आणि मराठी आणि गुजराती यांना वेगवेगळे राज्य हवे होते.तरीही सरकारने महाराष्ट्र आणि गुजरात दोन वेगळे राज्य न बनवता बॉम्बे ला वेगळे राज्य घोषित केले.मुंबई महाराष्ट्र राज्यात सामील करण्यासाठी महाराष्ट्र जनतेने खूप संघर्ष केला.


बॉम्बे एक अशी जागा होती जिथं मराठी आणि गुजराती भाषेतील लोक राहत होते.जेव्हा सर्व राज्य आपापल्या बोलीभाषेत राज्याचे संगठन करत होते, तेव्हा या दोन भाषेत बोलणाऱ्या लोकांनी पण त्याची स्वतःची ओळख स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या राज्याची मागणी केली.मराठी भाषा बोलणाऱ्या ना महाराष्ट्र आणि गुजराती भाषा बोलणाऱ्या गुजराज असे वेगवेगळे राज्य हवे होते.


मुंबई साठी मराठी आणि गुजराती लोकांमध्ये खूप विवाद झाले .मराठी लोकांना मुंबई महाराष्ट्र राज्यात पाहिजे होतो तर गुजराती लोकांचे म्हणणे होते की मुंबईची उन्नती चे श्रेय त्यांचे आहे म्हणून मुंबई त्यांना पाहिजे.


गुजरात राज्य निर्मितीसाठी महागुजरात आंदोलन करण्यात आले तर महाराष्ट्र निर्मितीसाठी मराठी लोकांनी संयुक्त समितीचे आयोजन केले.यासाठी लोकांनी खूप आंदोलन केले आणि संघर्ष केला .


जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला ,तेव्हा देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू ने बॉम्बे ला महाराष्ट्र आणि गुजरात असे वेगवेगळे राज्य घोषित केले.


मराठी माणसांपासून मुंबई तोडली जात असल्याची एक चीड तेव्हा धुमसत होती. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक भव्य मोर्चा फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात जमला.घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पोलिसांना हा मोर्चा आवरेना. त्यांनी लाठीचार्ज केला. तरीही जमाव पांगला नाही. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले.गोळीबार मध्ये १०० हुन अधिक लोक मारले गेले.


तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीला यश प्राप्त झाले आणि १ मे १९६० रोजी मुंबईला राजधानी चा दर्जा मिळाला,आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.


महाराष्ट्र राज्यात निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आल्यामुळे, २०१७ सालापासून राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे.भारतात पहिली रेल्वे सन १८५३ ला मुंबई पासून ठाणे पर्यंत होती.मुंबई ला स्वप्ननगरी असे म्हणले जाते.मुंबई येणाऱ्याला प्रत्येकाला सांभाळून घेते.


महाराष्ट्र राज्याबद्दल आणि त्यात मुंबई बद्दल बोलावे तितके कमी आहे .देशाची आर्थिक राजधानी म्हणून निर्माण झालेली मुंबई कायम धावत असते.प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला प्रामाणिकपणे मदत करते.अशी ही मायानगरी ला छोटे लंडन सुद्धा संबोधले जाते.पण कधीही शांत न राहनारी मायानगरी कोरोना महामारीत पूर्ण शांत झालेली अख्या जगाने पहिली.


महाराष्ट्र दिनाला अविस्मरणीय बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारा भव्य कार्यक्रम आयोजित केले जातात.या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भाषणं देतात.राज्याचे मुख्यमंत्री हुतात्मा चौकात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतात ,ज्यांनी राज्य निर्माण करताना आपला प्राण गमवावे लागले होते.मुंबई फक्त उद्योग क्षेत्राततच नाही तर पर्यटन क्षेत्रात सुद्धा अग्रेसर होते,याबरोबरच मुंबईत फिल्मसिटी चे केंद्र मानले जाते.फिल्मसिटी मुले मुंबईची एक वेगळीच ओळख आहे .



१ मे १९६० रोजी महाराष्ट्र निर्मिती झाली म्हणून महाराष्ट्र दिन पण मग कामगार दिन पण त्याच दिवशी का ?दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन जगभरातील कामगारांच्या गौरवण्यासाठी पाळण्यात येतो.०१ मे रोजी जगात ८० पेक्षा अधिक देशात कामगार दिन साजरा करतात.

कामगार दिवस याचा इतिहास

औद्योगिक क्रांतीनंतर कामगारांना रोजगार उपलब्ध झाला पण त्यांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असे.त्यांना काही सुविधा न देता १२-१६ तास राबून घेत असत.याबद्दल कामगार संघटना स्थापन करण्यात आली आणि कामगाराच्या काही मागण्या होत्या ,त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.परंतु उद्योजकानी याला  न जुमानता आहे तसेच चालू दिले.परिणामी अनेक आंदोलने उभारण्यात आले .त्यानंतर कामगार संघटनाची ०२ आंतरराष्ट्रीय अधिवेशन झाली  आणि १८९१ पासून कामगार दिन साजरा करण्यात आला.


भारतात पहिला कामगार दिवस ०१ मे १९२३ रोजी मद्रास शहरात पाळण्यात आला.लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या कामगार संघटनाने साजरा केलेला भारतातील पहिला कामगार दिन.


Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post