डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट || Demat & Trading account opening

शेअर बाजारात उत्सुकता असणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न नेहमी पडतो असतो, की डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे नक्की काय?या अकाउंट चे काम काय?अश्या या मूलभूत प्रश्नांची उत्तरे मिळवून आपण डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट कसे उघडायचे?


    डिमॅट अकाउंट म्हणजे काय?


    ◆डिमॅट खाते स्टॉक एक्सचेंजद्वारे आपले खरेदी केलेले शेअर्स ठेवण्यासाठी आहे.
    ◆डिमॅट हा Dematerialisation याचे संक्षिप्त रुप आहे.
    ◆यामध्ये स्टॉक,सरकारी बॉण्ड,म्युच्युअल फंड चे इलेक्टरीक स्वरूपात जतन केले जाते.
    ◆पूर्वी शेअर्स खरेदी ची Physical स्वरूपात सर्टिफिकेट दिले जायचे.जर ते हरवले किंवा गहाळ झाले तर असेल तर मोठी समस्या निर्माण व्हायची.त्यामुळे आता डिजिटल स्वरुपात मिळते.

    ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय?

    ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण सेक्युरिटी,रोख रक्कम चा हिशोब ठेवला जातो.या अकाउंट मधून रोजचा व्यापार केला जातो.
    व्यापारी खाते ब्रोकर कडून देण्यात येते.

    डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट कसे उघडावे?


    डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट आता सोप्या पद्धतीने उघडता येते.आता बरेसचे डिस्काउंट ब्रोकर आणि फुल्लसर्विस ब्रोकर एका दिवसात उघडून देतात..

    भारतात NSDL आणि CDSL द्वारे डिमॅट अकाउंट सेवा पुरवली जाते.ही सुविधा ब्रोकर्स मार्फत आणि मध्यस्तीमार्फत सेवा पुरवली जाते.या ब्रोकर्स ला depositary participants असे म्हणतात.ओळखीचा पुरावा आणि काही कागदपत्रे घेऊन ब्रोकर्स मार्फत डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडले जाते.

    डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट 

    उघडण्यासाठी आपल्याला खालील कागदपत्रे लागतात.
    ◆आधार कार्ड
    ◆पॅन कार्ड
    ◆बँकेच्या स्टेटमेंट किंवा कॅन्सल चेक
    ◆सही
    ही कागदपत्रे जमा केल्यावर एका दिवसात आपले ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट तयार होते.

    डिमॅट अकाउंट उघडण्यापूर्वी योग्य ब्रोकर निवडणे गरजेचे असते.
    त्यासाठी आपण फुल्ल सर्विस ब्रोकर तसेच डिस्काउंट ब्रोकर उपलब्ध आहेत.


    फुल्ल सर्विस ब्रोकर 


    Angle Broking एक चांगले फुल्ल सर्विस ब्रोकर आहे.
    तसेच फुल्ल सर्विस ब्रोकर
    1.Angel Broking
    2.ICICI Direct
    3.HDFC Securities
    4.Kotak securities
    5.ShareKhan
    6.Axis Direct
    7.SBI Securities
    8.IIFL Securities
    9.Motilal Oswal


    डिस्काउंट ब्रोकर्स


    यामध्ये प्रामुख्याने भारताचा नंबर एक चा डिस्काउंट ब्रोकर झेरोधा आहे.
    1.Zerodha
    2.Upstock
    3.5paisa
    4.Groww
    5.Paytm Money

    Post a Comment

    Post a Comment (0)

    Previous Post Next Post