T-Pin काय आहे? T-pin चे फायदे कोणते आणि तो कसा मिळवायचा?

आपण डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट बद्दल मागील लेखात माहिती घेतली. ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण  शेअर्स खरेदी करू करतो आणि पुढे तो शेअर्स एक सुरक्षित ठिकाणी सर्टिफिकेट च्या स्वरूपात आपण उघडलेल्या डिमॅट अकाउंट मध्ये सांभाळला जातो,हे काम Central Depository Service करतात.


    CDSL बद्दल थोडक्यात:


    Central Depository Service ची स्थापना फेब्रुवारी 1999 मध्ये झाली.CDSL मध्ये आपले शेअर्स ,सरकारी बॉण्ड्स तसेच म्युच्युअल फंडस् इत्यादी. लॉकर प्रमाणे सांभाळतो.आणि विकण्याच्या वेळेस आपली एक ओळख म्ह्णून T-Pin विचारण्यात येतो,तो जर टाकला तरच शेअर्स विक्री करता येते.


    T-pin म्हणजे काय?

    जेव्हा आपण शेअर्स खरेदी करतो त्यानंतर तो शेअर्स आपल्या डिमॅट मध्ये जतन केल्या जातो.पण जेव्हा आपण तो शेअर्स विक्री करत असतो, तेव्हा आपल्याला T-Pin ने आपली ओळख पटवून द्यावी लागते.त्याशिवाय आपण डिमॅट मधले कोणतेच शेअर्स विक्री करू शकत नाही.


    T-PIN म्हणजे टेलिफोन पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर ,हा नंबर 6 अंकी असतो.T-pin हा CDSL कडून देण्यात येत असतो,यात ब्रोकर चा कसल्याच पद्धतीने हस्तक्षेप नसतो.T-pin हा सहा अंकी असतो ज्याला आपण  केव्हाही बदलू शकतो.


    T-pin कसा मिळवायचा ?


    ◆नवीन T-pin मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला CDSL च्या होम पेज वर जावा लागेल.
    https://edis.cdslindia.com/home/generatepin
    ◆इथे आपल्याला BO नंबर आणि पॅन कार्ड क्रमांक टाकून Next वर क्लिक करा.
    ◆Next वर क्लिक केल्यावर आपल्या रेजिस्टरड मोबाइल नंबर वर एक OTP येईल.
    ◆OTP टाकल्यानंतर आपल्याला रेजिस्टरड मोबाइल नंबर वर आणि रेजिस्टरड ई-मेल वर आपला T-Pin नंबर CDSL कडून प्राप्त होतो.


    T-pin कसा बदलायचा?

    जर काही कारणास्तव आपल्याला प्राप्त झालेला T-pin बदलायचा असेल,तर आपण या पद्धतीने बदलू शकतो.


    ◆सर्वप्रथम आपल्याला CDSL च्या HOMEPAGE वर जावे लागेल.
    ◆त्यानंतर आपल्याला Change - eDIS PIN वर क्लिक करा.
    ◆इथे आपल्याला आपला BO क्रमांक आणि पॅन कार्ड नंबर टाकून Next वर क्लिक करा.
    ◆Next वर क्लिक केल्यावर आपल्या रेजिस्टरड मोबाईल नंबर वर एक OTP येईल.
    ◆हा OTP टाकून सबमिट केल्यावर आपल्या रेजिस्टरड मोबाइल नंबरवर आणि रेजिस्टरड ई-मेल वर आपला नवीन T-PIN प्राप्त होतो.


    अश्या प्रकारे आपण शेअर्स च्या विक्री वेळेस एक T-Pin मिळवू शकतो.

    Post a Comment

    Post a Comment (0)

    Previous Post Next Post