Stock Market Order Type in marathi

स्टॉक बाजारात प्रवेश करण्यासाठी आपल्याला बाजार कश्या प्रकारे कार्य करतो हे देखील माहीत असणे ,तिककेच महत्वाचे ठरते.यासाठी आपण आज ऑर्डर चे प्रकार आणि त्या ऑर्डर कश्या प्लेस करायच्या याबद्दल जाणून घेणार आहोत.
    सर्वप्रथम स्टॉक मार्केट मध्ये महत्वाच्या 2 प्रकारात शेअर्स ची देवानघेवान होते,ती म्हणजे ,

    Delivery 


    यामध्ये शेअर्स खरेदी करून आपण हवा तितका वेळ आपल्याकडे डिमॅट अकाउंट मध्ये ठेऊ शकतो.
    तसेच या प्रकारे शेअर्स घेताना ब्रोकर कडून Exposure मिळत नसते.हा व्यवहार पूर्णपणे कॅश वर होतो.डिलीव्हरी ऑर्डर्स ही 3 महिने म्हणजेच शॉर्ट टर्म्स आणि 3 महिन्यापेक्षा जास्त म्हणजेच लॉंग टर्म्स साठी करण्यात येते.डिलीव्हरी साठी ब्रोकरेज चार्जेस अगदीच कमी असतात ,ते म्हणजे नाही च्या बरोवर.
    डिलीव्हरी मध्ये आपण कोणताही स्टॉक आपल्याला हव्या त्या किमतीवर घेण्यासाठी आपण GTT ऑर्डर लावू शकतो (Good Till Triggered orders).ही ऑर्डर दिल्यावर कमीत कमी 1 वर्ष वैध असते,जर एक वर्षात ऑर्डर प्लेस झाली माही तर पुन्हा एकदा manually GTT प्लेस करावी लागते.
     

    Intraday  


    यामध्ये प्रामुख्याने आज खरेदी झालेला शेअर्स आजच बाजार बंद होण्याअगोदर विक्री करणे बंधनकारक असते.जर आपण ते विक्री करण्यास विसरलो किंवा काही कारणाने विक्री नाही करता आले तर आपल्या ब्रोकर कडून स्वयंचलित सिस्टिम मार्फत विक्री करण्यात येते, त्यासाठी वेगळे 50 रुपये चार्जे लागतात.Intraday ऑर्डर मध्ये जर आपन स्टॉक खरेदी केला असेल आणि आपल्याला वाटले की आता तो स्टॉक मला डिलीव्हरी मध्ये कन्व्हर्ट करायचा तर आपण तसे कन्व्हर्ट इक्विटी मध्ये करू शकतो.सर्वात जास्त रिस्क ही intraday ट्रेडिंग मध्ये असते.त्यामुळे नवीन ट्रेडर्स ने या बद्दल पूर्ण माहिती घेऊनच Intraday करावी.अन्यथा पैसे गमावून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    AMO ऑर्डर्स :


    या प्रकारात ट्रेडर्स साठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. खास करून त्या ट्रेडर्स ना याचा फायदा होतो ,जे चालू मार्केट मध्ये शेअर्स चा भाव ट्रॅक करू शकत नसतात. ते Amo ऑर्डर मार्फत शेअर बाजार बँड झाल्यावर सुद्धा पुढल्या ट्रेडिंग दिवसासाठी आजच ऑर्डर देऊ शकतात.यामुळे त्यांना योग्य त्या किमतीवर शेअर्स खरेदी करताना काही प्रमाणात दिलासा मिळतो.तरीपण हा प्रकार फक्त डिलिव्हरी साठी योग्य असतो कारण intraday मध्ये शेअर बाजार चालू असतानाच खरेदी-विक्री
    करणे आधीक सोईस्कर ठरते.

    BTST (BUY TODAY SELL TOMMORROW) ऑर्डर 


    भारतात बरेसचे ब्रोकर ट्रेडर्स साठी ही सुविधा पुरवतात ज्यामध्ये प्रामुख्याने आज शेअर खरेदी करून उद्या विक्री करता येतो.या प्रकारच्या ट्रेडिंग ला आपण शॉर्ट सेलिंग असे म्हणू शकतो.

    STBT (SELL TODAY BUY TOMMORROW) ऑर्डर्स


    भारतात बरेच ब्रोकर्स BTST प्रमाणेच STBT ही सुविधा पुरवतात ज्यामुळे ट्रेडर्स ला आज शेअर विक्री करून उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी खरेदी करावा लागतो.

    BTST आणि STBT हे फक्त डिलिव्हरी मध्ये काम करते.

    जेव्हा ट्रेडर्स futures किंवा ऑपशन खरेदी विक्री करतो तेव्हा त्याचा ब्रोकर्स त्या ट्रेडर्स साठी एक विशिष्ट रक्कम त्याला मार्जिन म्हणून पुरवत असतो,
    सामन्यात या मार्जिन चे दोन प्रकार असतात.

    Span Margin


    हे मार्जिन derivative मार्केट मध्ये जास्त प्रमाणात वापरण्यात येते.
    यात प्रामुख्याने समभागांचे मार्जिन म्हणजे आपल्या ब्रोकरकडून आपल्यासाठी कर्ज असते जेणेकरून आपण कमी उपलब्ध भांडवांशिवाय अधिक स्टॉक खरेदी करू शकाल.

    Exposure Margin


    यामध्ये प्रामुख्याने ट्रेडर्स ला ब्रोकर कडून काही विशिष्ट प्रकारे शॉर्ट टर्म कर्ज सारखी प्रकिया असते.ज्याचा वापर करून ट्रेडर्स कमी भांडवल मध्ये अधिक शेअर्स चा व्यवहार करून आपला पोर्टपोलिओ सुधारू शकतो.प्रत्येक ब्रोकर्स हा वेगवेगळ्या रकमेची exposure देऊ करत असतो ,ज्यामध्ये आपण एक लाख रुपयांचे शेअर्स मात्र दहा हजारात ही खरेदी करू शकतो.

    परंतु मी आपणा सर्वाना एकच सांगेन की Exposure नेहमी आपल्या गरजेपुरतेच वापरावे.

    Post a Comment

    Post a Comment (0)

    Previous Post Next Post