Stock Buy and Sell Analysis

कोणताही स्टॉक खरेदी करण्यासाठी आपल्याला त्याचे विश्लेषण करणे आवश्यक असते.जेणेकरून आपण स्टॉक मार्केट मध्ये आपले भांडवल टिकविण्यास आणि वाढविण्यास मदत करतात.कोणताही स्टॉक घेताना आपण तो स्टॉक किती काळासाठी ठेवणार आहोत ,हे ही तितकेच महत्त्वाचे ठरते.

चला तर मग बघुयात स्टॉक खरेदी करताना कोणते विश्लेषण करावे लागते.

    मूलभूत विश्लेषण

    हे अगदी नावाप्रमाणेच आहे मूलभूत विश्लेषण पण हे इतके सोपेही नाही.
    यामध्ये खूप अश्या गोष्टी आपण बारकाईने अभ्यासाव्या लागतात.
    त्या पुढीलप्रमाणे,
    ◆गुंतवणूकदाराची मानसिकता
    जो गुंतवणूकदार स्टॉक मध्ये गुंतवणूक करणार आहे त्याची मानसिकता काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.त्याला नक्की ट्रेडिंग करायची का गुंतवणूक हे आधी पक्के ठरवा.

    ◆कंपनीची मूलभूत माहिती
    त्याचबरोबर आता जो स्टॉक आपण घेतोय त्या कंपनी बद्दल मूलभूत माहिती काढावी ,जसे की 

    ★कंपनीची स्थापना कधी झाली?

    ★कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत?

    ★कंपनीचे प्रॉडक्ट काय आहेत?

    ★प्रॉडक्ट बद्दल बाजारात काय भावना आहेत?

    ★कंपनीवर कुठल्या प्रकारचे डेबिट आहे का?

    ★कंपनी चे मागील 5 वर्षातील प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट अभ्यासावे.

    ★कंपनीची भविष्यात काही धोरणे आहे का?

    ◆कंपनी चे बाजारमूल्य सुद्धा तपासावे.

    ◆त्या कंपनीचा कॅश फ्लो पहावा.

    ◆कंपनी चा व्यवसाय काय आहे?आणि त्याबद्दल सद्यपरिस्तित काही घटना घडली आहे का त्याकडेही लक्ष द्यावे लागते.

    ◆कंपनी चा स्तर वारंवार बघत राहायचा,
    त्यामध्ये कर्जाचा स्टर चा ग्राफ बघा, कंपनी मिळकत बद्दल ग्राफ बघा जेणेकरून समजेल दिवसेंदिवस कंपणीची वाटचाल काय आहे?

    ◆कंपनीचा profit growth rate बघणे गरजेचे आहे.

    ◆तसेच  आपली Watchlist मध्ये तेच स्टॉक निवड करा जेणेकरून आपल्याला त्यावरील रोजची अपडेट समजेल.

    हे तर झाले मूलभूत विश्लेषण,याचबरोबर अजून एक असते ते म्हणजे टेक्निकल विश्लेषण.

    टेक्निकल विश्लेषण


    हे थोडे किचकट असते पण यातून आपण बरेच काही संभाव्य घटना समजावून घेऊ शकतो.
    यामध्ये आपल्याला काही टेक्निकल गोष्टी लक्षात घ्यायला लागेल.

    ◆स्टॉक ची ओपन आणि क्लोस ,उच्च आणि कमी किंमत ,PE ratio ,ट्रेंड समजून घेणे.

    ◆यासाठी एक चार्ट असतो,त्या चार्ट वरील बाबी लक्षात घेऊन तो चार्ट आपल्याला बरीसची माहिती देत असतो.

    ◆त्यासाठी त्या चार्टवर तयार होणाऱ्या candle चे प्रकार आणि त्याचा अर्थ आधी समजाला पाहिजे.

    ◆तसेच बरेच स्टॉक स्क्रीनर बाजारात मोफत उपलब्ध आहे.

    ◆कॅडल चा अर्थ समजून घेताना आपल्याला मदत करतात ते इंडिकेटर्स.
    जवळपास 150 इंडिकेटर्स आहेत जे आपल्याला स्टॉक घेताना  अचूक माहिती प्रदान करतात.

    अश्याप्रकारे आपण या सर्व बाबी लक्षात घेऊन स्टॉक खरेदी करू शकतो.

    Post a Comment

    Post a Comment (0)

    Previous Post Next Post