कोणत्याही शेअर्स खरेदी अथवा विक्री करताना आपल्याला टेक्निकल विश्लेषण करावे.यासाठी बरेच इंडिकेटर्स उपलब्ध आहेत.आपण सर्व इंडिकेटर्स ची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
पण आज आपण येथे RSI (RELATIVE STRENGTH INDEX) या इंडिकेटर्स बद्दल माहिती घेणार आहोत.RSI (RELATIVE STRENGTH INDEX)
RSI हा इंडिकेटर्स ट्रेडिंग करताना खूपच उपयोगी ठरत असतो.हा इंडिकेटर्स च्या काही बेसिक गोष्टी लक्षात घेऊन त्यावर अभ्यास करून ट्रेडिंग केल्यास आपण नक्कीच नफा वाढवू शकतो.
चला तर पाहुयात RSI Indicator हा आहे RSI इंडिकेटर निफ्टी 50 वर लावलेला.हा चार्ट 1 तास timeframe वर लावलेला आहे.
RSI आपल्याला 2 महत्वाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते.
1.स्टॉक oversold (विक्री मर्यादा च्या बाहेर)गेला आहे का?
2.स्टॉक overbrought(खरेदी जास्त प्रमाणात)आहे का?
RSI चे Structure कसे असते?
★RSI चा चार्ट इंडेक्स 01 ते 100 असा असतो.
★ज्यामध्ये इंडेक्स हा 30 च्या खाली असेल तर स्टॉक हा oversold(जास्त प्रमाणात विक्री)झालेली असते.
★आणि इंडेक्स जर 70 च्या वरती असेल तर स्टॉक हा overbrought(खरेदी जास्त प्रमाणात)झालेली असते.
RSI इंडिकेटर्स काम कसे करते?
RSI ची default सेटिंग 30-70 असते.यावरून आपण अंदाज लावू शकतो.
जर स्टॉक हा oversold झोन मध्ये असेल तर तो आपल्यासाठी खरेदी चा सिग्नल असतो.
आणि स्टॉक हा overbrought झोन मध्ये असेल तर नक्कीच तो आपल्यासाठी विक्री चा सिग्नल असेल.
यात आपण निरीक्षण आणि अभ्यास याचा समतोल साधून जास्तीत जास्त अचूकता येण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
काही महत्वाचे:
◆कोणत्याही स्क्रिप्ट चा चार्ट हा एकच timeframe वर आधारित घेऊ नये.
◆नेहमी Intraday करताना 1 मिनिट-5 मिनिट आणि अर्धा तास या वेळेचा चार्ट चे समन्वय साधूनच ट्रेड करावे.
◆Delivery मध्ये ट्रेडिंग करताना चार्ट हा 1 दिवस-1 आठवडा आणि 1 महिना यांचा ताळमेळ राखूनच ट्रेडिंग करावी.
◆ट्रेडिंग मध्ये खूप रिस्क असते त्यामुळे नवीन ट्रेडर्स ने सुरवातीला Intraday ट्रेडिंग करणे टाळले पाहिजे.
CONNORS RSI
Connors RSI तीन घटक एकत्रीत करून सांगतो ज्याच्या आधारावर आपण स्टॉक खरेदी आणि विक्रीसाठी अनुमान लावू शकतो.
1.Price Momentum
PM यामध्ये प्रामुख्याने स्टॉक च्या किमतीवरील हालचाली के सुरू आहेत यावर RSI डेटा देत असतो.
2.Duration of Up/Down trade:
ठराविक किमतीवर जास्त खरेदी अथवा विक्री झाली आहे ,याची परिस्थिती दर्शवते.यावरून आपण अनुमान लावू शकतो की आता कोणता ट्रेंड सुरू आहे .
3.Relative Magnitude of Price change :
यामध्ये RSI हा आजच्या तुलनेत मागील किमतीतील किती बदल झाला हे सांगते.
STOCHASTC RSI
हे एक असे टेक्निकल इंडिकेटर्स आहे ज्यामध्ये बाजाराच्या गतीवर लक्ष केंद्रित करणार्या आणि Overbrought आणि Oversold मार्केटच्या परिस्थितीचे निरीक्षण अभ्यास करण्यात STOCHASTC RSI एक अनोखी भूमिका निभावते.
रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) सारख्या इतर तांत्रिक निर्देशकांपेक्षा स्टोचआरएसआय वेगळे आहे कारण ते आरएसआयच्या तुलनेत Overbrought किंमतीपेक्षा Oversold वर वेगाने जाते.
आशा करतो की आपल्याला RSI Indicator बद्दल माहिती मिळाली असेल.तरीही याबद्दल काही प्रश्न असतील तर कंमेंट द्वारे कळवा.
Post a Comment