Technical Analysis Bollinger Band's

मित्रानो!
आपण मागील लेखात RSI (RELATIVE STRENGTH INDEX) बद्दल माहिती घेतली.
त्यानंतर आपण आता Bollinger Bands या इंडिकेटर्स बद्दल माहिती घेणार आहोत ,ज्याचा वापर करून शेअर बाजारात आपण अधिक नफा बनवू शकतो.

    चला तर मग पाहुयात काय आहे Bollinger Bands.

    Bollinger Bands चे Structure :

    बोल्लिंगर बँडस मध्ये प्रामुख्याने 3 लाइन्स असतात.
    त्या पुढीलप्रमाणे,
    1.Upper Band : Standard Deviation आहे.
    2.Middle Band : मागील दिवसाचे moving average असते.
    3.Lower Band : Standard Deviation आहे.
    जे की किमतीत आलेल्या अस्थिरतेवर नेहमी बदलत असते.
    बोल्लिंगर बँडस ची डिफॉल्ट सेटिंग ही (20,2) अशी असते.या सेटिंग मध्ये काही बदल करण्याची गरज नाही कारण ही सेटिंग मध्ये आपण योग्य टाइमफ्रेम वापरून ट्रेडिंग मध्ये अचूकता आणू शकतो.

    Bollinger Bands चा वापर कसा करायचा?


    Bollinger band समजून घेण्यासाठी आपण उदारणार्थ यथे Tata Motors चा शेअर घेऊ.

    1.जेव्हा टाटा मोटर्स च्या शेअर च्या किमतीमध्ये Volatility(अस्थिरता) वाढते ,तेव्हा Upper आणि Lower Bands चा आकार मोठा होतो.

    2.जेव्हा टाटा मोटर्स च्या शेअरच्या  किमतीमध्ये Volatility(अस्थिरता) एकसारखी राहते ,तेव्हा upper आणि Lower band एकसंथ पने सुरू राहतात.याला आपण Sideways Price Action असाही म्हणू शकतो.

    3.जेव्हा टाटा मोटर्स च्या शेअर्सच्या किमतीतील Volatility(अस्तिरता) खूपच कमी होते,तेव्हा Upper आणि Lower band आखूड (लहान) होतात.
    यातून आपल्याला सिग्नल मिळत असतो की आता बाजारात खरेदीसाठी योग्य वेळ आहे का विक्रीसाठी.

    Bollinger Band चा वापर :

    आपण सोप्या भाषेत समजून घेऊ की bollinger band चा ट्रेडिंग करताना कसा वापर करायचा.

    1.ज्यावेळेस कॅडल Upper Band ला स्पर्श करते,तेव्हा समजून घ्यायचा की आता Bullish trend आहे.त्यावेळेस खरेदी करू नये.पण जर negative कॅडल पॅटर्न तयार होत असेल तर विक्री करायला हरकत नाही.

    2.ज्यावेळेस कॅडल Lower Band ला स्पर्श करते,तेव्हा समजून घ्या की आता Bearish trend आहे.जर काही negative कॅडल पॅटर्न तयार झाला तर खरेदी करू शकता.

    काही महत्त्वाचे: हा शेअर खरेदी किंवा विक्री करताना फक्त Bollinger Bands वरच न अवलंबून राहता ,RSI किंवा MACD चा आधार घेऊनच ट्रेड करावे.


    Support आणि Resistance Level कशी ओळखायची?


    ट्रेडिंग करताना सपोर्ट आणि रेसिस्टन्स लेवल ओळखायला अली तरच आपण ट्रेड मध्ये अचूकता आणू शकतो.
    चला तर मग पाहुयात सपोर्ट आणि रेसिस्टन्स लेवल कशी ओळखणार?

    1.जर एक Bullish कॅडल middle Bands ला स्पर्श करून त्यांनतर लगेचच दुसरी किंवा तिसरी Bullish कॅडल Upper बँड कडे जात असेल ,तर तो Bullish Trend आहे.याला आपण Sucessfull Bullish candelstick pattern (Support) असे म्हणू शकतो.यामध्ये Bullish Candle Pattern तयार होताना M (इंग्रजी भाषेत अक्षर) या आकारात candlestick चा पॅटर्न तयार होतो ,त्याला आपण Dubble Top पॅटर्न अस म्हणतो.
     
    2.जर एक Bearish कॅडल Middle Bands ला स्पर्श करून लगेचच दुसरी किंवा तिसरी कॅडल Lower Band ला स्पर्श करत असेल ,तर तो Bearish Trend आहे.यालाच आपण Sucessfull Bearish Candlestick Pattern (Resistance) असे म्हणू शकतो.यामध्ये Bearish Candlestick Pattern तयार होताना W (इंग्रजी भाषेतील अक्षर) आकाराचे candle पॅटर्न तयार होतात.याला आपण Dubble Bottom पॅटर्न असे म्हणतो.


    स्टॉप लॉस कसा निवडायचा?


    1.Bullish Trend मध्ये स्टॉक घेतल्यास जिथून M पॅटर्न (इंग्रजी भाषेतील अक्षर) तयार झालाय किंवा जेथून Bullish trend सुरू झालाय,त्याची Low Price स्टॉप लॉस म्हणून निवडावी.

    2.Bearish Trend मध्ये स्टॉक घेल्यास जिथून W pattern( इंग्रजी भाषेतील अक्षर) तयार झालाय किंवा Bearish Trend चालू झालाय ,त्याची  Low Price स्टॉप लॉस म्हणून निवडावी.

    काही महत्त्वाचे: या पॅटर्न वरून ट्रेड करण्याअगोदर RSI ची लेवल बघणे गरजेचे असते.
    तसेच प्रत्येक ट्रेडिंग साठी वेगवेगळ्या Timeframe तितकाच महत्वाचा आहे.

    Intraday 

    5मिनिट
    10 मिनिट
    अर्धा तास


    Short Term (2 ते 3 दिवसांसाठी )

    15 मिनिट
    30 मिनिट 
    1 तास


    Long Term Invest (जास्त वेळेसाठी गुंतवणूक)

    1 आठवडा
    1 महिना 

    आशा करतो की आपल्याला Bollinger's Band's Indicator बद्दल माहिती मिळाली असेल.तरीही याबद्दल काही प्रश्न असतील तर कंमेंट द्वारे कळवा.

    Post a Comment

    Post a Comment (0)

    Previous Post Next Post